आई (Aai)

ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली तेंव्हापासून ते या क्षणापर्यंत आणि अनंत काळापर्यंत हे अजब रसायन आपल्या हातून कसं घडलं ह्याचे त्या जगन्नियंत्यालाही न उलगडणारं कोडं आहे.

आपल्याला ९ महिने ९दिवस वाढवण्यापासून ते अगदी आपण वयोवृध्द होईपर्यंत माझं बाळ हीच भावना मनामधे बाळगणारी फक्त आईच असू शकते.

काही बाबतीत वडीलदेखिल आईची भूमिका घेतात ह्यामधे शंकाच नाही.

आईबरोबर तासंतास गप्पा मारल्या ( आपल्याला वेळ असेल तेंव्हा) तरी आई खूश असते आणि एखादी धावती भेट दिली किंवा नुसता एक कॉल केला तरी आई खूश असते.

आईच्या सान्निध्यात आपण निवांत असतो.

आईला बरोबर माहिती असतं की आपल्याला काय पाहिजे, काय विचार चाललेले आहेत आणि नेमकं कुठे दुखतंय.

जगातला सगळ्यात पहिला वैद्य म्हणजे आईच आणि लाख दुखोंकी एक दवा म्हणजे आईच.

तिला सोडून जाताना परत भेटीची ओढ लागून राहते हे आईपासून दूर गेलेल्या व्यक्तिंना नक्कीच वाटत असावे.

आईच्या संगतीत कितीही वेळ घालवला तरी तिला सोडून जाताना पाय जड होतात.

हे सगळं सांगण्याचं प्रयोजन म्हणजे आपल्याच समूहातील श्री शेखर जोगळेकर आणि सौ. उल्का जोगळेकर ह्या दांपत्याने वनराईने नटलेल्या निसर्गरम्य कोकणातल्या हेदवीमधे स्थापित केलेली आणि वास्तूला व्यक्तिची ओळख प्राप्त करुन दिलेले स्थान म्हणजे “आई”.

तुम्हाला नुसतं निवांत पडायचं आहे, बसायचं आहे, सखोल विचार करायचा आहे, मनन, चिंतन आणि आपल्यातल्या नकारात्मक उर्जेचं हनन करायचं आहे मग “आई”कडे जाणं आवश्यक आहे.

तुम्हाला पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर व्हरांड्यामधल्या खुर्चीवर बसून तुम्ही बसल्या जागी किमान २५ प्रकारचे पक्षी बघू शकता.

तुम्हाला खगोल निरीक्षणाची आवड असेल तर तुम्ही त्याच व्हरांड्यातून १८० डिग्रीमधे फिरणार्या अंतरिक्षाचे अवलोकन करु शकता.

तुम्हाला समुद्रावर फिरायला आवडतं मग तुम्ही २ किलोमीटर अंतरावर असलेल्या हेदवीच्या समुद्र किनार्यावर जाऊन स्वच्छ पाण्यामधे पाय बुडवुन विश्रामासाठी जाणार्या भास्कराचे अबाधित दर्शन घेऊ शकता.

तुम्हाला देवदर्शनाची आवड असेल तर हेदवीमधल्याच दशभुजा गणपति मंदीरामधे तुम्ही सकाळच्या आणि सांजेच्या आरतीला जाऊ शकता.

४ किलोमीटर अंतरावर असणार्या वेळणेश्वराचे दर्शन घेऊ शकता.

तुम्हाला समुद्रभ्रमण करायचे आहे मग तुम्ही तवसाळच्या खाडीतून पलीकडच्या देवगड बंदरावर जाणार्या फेरी बोटीमधून स्वतःच्या वाहनाने जाऊ शकता.

तिथे असलेल्या दीपस्तंभावर जाऊन अथांग पसरलेल्या निळ्याशार रत्नाधीशाला अभिवादन करु शकता.

आणि काहीच न करता कुलरची हवा खात “आईच्या” सान्निध्यात आरामही करु शकता.

आपल्याला चविष्ट ब्राम्हणी पदार्थांची चव घ्यायची असेल तर सकाळच्या न्याहारीसाठी योगेश ओक ९४०५७२८२११ आणि दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी प्रसाद ओक ९४२११४२४१६ ह्यांना पर्यायच नाही.

मात्र सामिष आहार येथे अजिबात मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला तवसाळच्या खाडीवरील श्री निलेश सुर्वे ९४२०५24433 ह्यांच्याकडे किंवा वेळणेश्वर येथे असलेल्या सामिष भोजनालयांचीच वाट धुंडाळावी लागेल.

आम्ही २ दिवसांसाठीच गेलो होतो. पण आपसूकच अजुन एक दिवसाचा मुक्काम वाढवला गेला.

तिथे व्यवस्थापक असलेल्या श्री गोणबरे दांपत्याने पूर्ण वास्तू आणि तेथिल विविधांगाने नटलेली पु्ष्पवृक्ष आणि फलवृक्षांची बाग अत्यंत स्वच्छ आणि सुंदर ठेवलेली आहे. येणार्या अभ्यागतांनीही वास्तूचे पावित्र्य राखावे ही माफक अपेक्षा श्री व सौ. जोगळेकरांची आहे.

अजुन खूप काही लिहीता येईल पण मी आपल्या सगळ्यांना आवर्जुन सांगेन की तुम्हाला जर ताजंतवानं व्हायचं असेल तर

“आईला” भेट देणं आवश्यक आहे.

एकदा अनुभव जरूर घ्या.

संपर्कः श्री शेखर जोगळेकर – ९८२०२९५७७०

किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवरुनह आपण बुकिंग करु शकता.

www.aaibungalows.com

शुभास्ते पंथानः

– धनंजय कुवर

🙏